Warning: Got error 134 from storage engine query: SELECT data, created, headers, expire, serialized FROM cache WHERE cid = 'variables' in /var/www/html/mrsac/includes/database.mysqli.inc on line 134 आमची माहिती | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन सेंटर

आमची माहिती

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर ह्या स्वायत्त संस्थेची स्थापना नागपूर येथे स.न. १९८८ मध्ये राज्य शासनाने नियोजन विभागाच्या नियंत्रणाखाली केलेली आहे.

आज,महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर उत्तमरित्या प्रस्थापित झालेले असून, राज्य शासनाच्या संपुर्ण मदतीमुळे, केंद्राची ओळख "सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारी राज्यातील गणमान्य संस्था" म्हणुन करण्यात येते.

दोन दशकाहून अधिक प्राप्तः असलेल्या अनुभवानुसार ह्या केंद्राने राज्य शासनाच्या विविध विभागात व शैक्षणिक संस्था मध्ये तंत्रज्ञान वापराबाबत वेगवेगळे उपयोजन प्रकल्प राबविले आहेत.

विविध उपयोजनांमध्ये मृद व जलसंधारण, भुजल पोटेन्शियल, वन व जैव विविधतेचा अभ्यास, पिकक्षेत्र अंदाज, पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन, सागर किनारा अभ्यास, शहर विकास इत्यादीचा अंतर्भाव आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व विकासासाठी केंद्र सतत प्रयत्नशील असुन त्याकरिता सुदूर संवेदन व भौगोलीक माहिती प्रणालीचा परिणामकारकरित्या उपयोग करण्यात येत आहे. त्याचबरोबर सातत्याने होणारी लोकसंख्या वाढ व eco-system संतुलनात होणाऱ्या बदल नोंदीची दुहेरी लक्षकरिता, सुदूर संवेदन व भौगोलीक माहिती प्रणालीच्या उपयोगासाठी आवश्यक अशी माहिती संच व वितरणासाठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

अश्या प्रकारच्या बहु-मापनातील पायाभुत माहितीचा व तदनुसार विकसित केलेल्या वेब जिओ पोर्टलचा उपयोग राज्याला “ई-प्रशासनात”  मदत करण्याकरिता  एमआरसॅक कटीबध्द आहे.