वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 • प्र.१. एम.आर.एस.ए.सी. / म.सु.सं.उ.कें. चे विस्तारित रूप काय आहे ? उ-१ महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र
 • प्र.२. एम.आर.एस.ए.सी. कडून उपग्रहाचे माहिती संच कसे प्राप्त करावे ? उ-२. एम.आर.एस.ए.सी. उपग्रहाचे माहिती संच उपयोक्तयास उपलब्ध करून देत नाही आणि त्याकरिता भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था, अंतरीक्ष विभाग, भारत सरकार द्वारे निर्धारीत केलेल्या सुदूर संवेदन माहिती संच धोरणाचे (आर.एस.डी.पी.) पालन करते. उपग्रहाचे माहिती संच राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र (एन आर एस सी), हैद्राबाद येथुन प्राप्त करता येते. विस्तृत माहितीसाठी www.nrsc.gov.in ला भेट दया.
 • प्र.३. एम.आर.एस.ए.सी. द्वारे कोणकोणत्या प्रकारच्या सेवा / कुशलता दिल्या जातात ?

  उ-३ एम.आर.एस.ए.सी. सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानाद्वारे खालील प्रकारच्या सेवा / कुशलता प्रदान करते.

  • संसाधन संपदांचे मापन आणि सनियंत्रण : जमिन व कृषी विषयक ; मृदा, वने, पृथ्वीचा पृष्ठभाग व भूगर्भातील जल, किनारपट्टी क्षेत्र विषयक,
  • शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत गरजा आणि उपलब्ध सोई याचे नकाशीकरण.
  • जिओ-स्पेशीयल सूचना प्रणाली विकसित करणे विशेषतः डेस्कटॉप आणि वेब आधारीत उपयोजन
  • केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत भूमि आणि भूसंसाधन संपत्तीचे संयुक्त प्रकल्प जिओ-स्पेशिअल माहिती संग्रहाचे / कोषाचे व्यवस्थापन आणि देखभाल करणे.
  • प्रयोगकर्त्या विभागाला त्याच्या आवश्यकतेनुसार तसेच विद्यार्थ्याच्या पाठ्याक्रमानुसार प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करणे.
 • प्र.४. सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणालीच्या प्रकल्पांना साधारणतः किती खर्च येतो ? उ-४ सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणालीच्या प्रकल्पाचा खर्च प्रत्येक प्रकल्पाच्या आधारे ठरविला जातो. जसे, प्रकल्पाच्या कामाचे परिमाण, त्याची व्याप्ती, (विविध) उपग्रह माहिती संचाचा प्रकार / वापर, सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणालीच्या आज्ञावली वापर आणि प्रकल्पासाठी लागणारे तांत्रीक कौशल्य या बाबींनुसार खर्च निश्चित केला जातो.
 • प्र.५. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्रातून सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणालीचे प्रकल्प कसे राबवू शकतो. उ-५ सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणालीचे प्रकल्प राबविण्यासाठी उपयोक्त्यांस आपले कार्य प्रयोजन संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र यांच्याकडे प्रेषित करावे. कार्यालयातील तांत्रीक गट प्रयोजनाचे आवश्यकतेनुसार मूल्यमापन करून प्रकल्प प्रस्ताव तयार करतात. प्रकल्प प्रस्ताव एकदा मंजूर झाल्यानंतर व त्यानुसार महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राला निधी प्राप्त होताच प्रस्तावात दिलेल्या कार्ययोजने नुसार प्रकल्प पुर्ण केला जातो.
 • प्र.६. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राने यापूर्वी पूर्ण केलेल्या प्रकल्पाची माहिती कशी प्राप्त करावी ? उ-६ महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र साधारणतः विशिष्ट उपयोक्त्यासाठी प्रकल्प हाती घेतात. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पाची माहिती ही त्या त्या उपयोक्त्याची माहिती संपदा असल्यामुळे महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र ही माहिती त्रयास्ताला हस्तांतरीत करीत नाही किंवा उपयोक्त्याने अशा प्रकारच्या माहिती हस्तांकरणासाठी अधिकृत मान्यता दिल्यानंतर त्यांचे हस्तांतरण शक्य होते. त्याकरिता इच्छुक त्रयस्ताला अशा उपयोक्त्याशी संपर्क साधावा लागतो आणि त्यानुसार उपयोक्त्याने ठरविलेल्या आवश्यक अशा निधीचा भरणा करुन माहिती प्राप्त करू शकतात
 • प्र.७. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणालीचे प्रशिक्षण कसे प्रदान करतात ? उ-७ महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र व्यक्तिगत किंवा संस्थेसाठी नियमित प्रशिक्षण वर्ग चालवत नाही. परंतु उपयोग करणाऱ्या संस्थेकडून विशिष्ट अशा प्रशिक्षणाची मागणी आल्यास तसेच उपयोक्त्याची गरज लक्षात घेता प्रशिक्षण वर्गाच्या अभ्यासाची आखणी करून व प्रशिक्षण मुल्य घेवुन प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. त्याकरिता असा उपयोग करणाऱ्या संस्थेने किंवा व्यक्तीने सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणालीचे प्रशिक्षण घेण्याकरिता संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर यांच्याशी संपर्क साधावा.
 • प्र.८. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र विद्यार्थ्यांना कामकाज करू देतात का ? उ-८ होय. या केंद्रात विद्यार्थ्यांना त्यांच्या स्नातक / स्नातकोत्तर अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणार्थीं समजून कामकाज करू देतात. जसे एमसीए, बी.टेक.,( कँम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स), एमएससी (रिमोट सेन्सिंग, अग्रीकल्चर इंजिनिअरिंग), एमएससी जिओ एन्व्हायर्नमेंट, अर्थ सायन्स, इ. इच्छुक विद्यार्थी / महाविद्यालय, संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र यांना अशा आशयाचे निवेदन सादर करतील. अशा प्रशिक्षणार्थींना तीन ते सहा महिन्याच्या कालावधी करिता कामकाज करावे लागेल. त्या काळात प्रशिक्षणार्थींना कोणतेही वेतन किंवा विद्या-वेतन अनुदेय राहणार नाही.
 • प्र.९. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राशी संपर्क कसा साधावा ? उ-९ त्याकरिता कृपया संपर्क साधा या वेब लिंक वर क्लिक करावे.