प्रशिक्षण

शासनाचे विभाग

 1. रिमोट सेन्सिंग व जीआयएस विषयांवर, विविध विभागातील अधिकारीनी त्यांचे कार्य नियोजन पद्धतीत ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी प्रशिक्षण आयोजीत करण्यात येते
 2. कार्य क्षेत्र पातळी वरील कर्मचाऱ्यांना जीआयएस कामाबाबत प्रशिक्षण देणे.
 3. एमआरसॅक तर्फे पुरविण्यात आलेल्या मानचित्राचा विविध विकास कार्यात उपयोग करण्याबाबत प्रशिक्षण देणे.

शैक्षणिक संस्था

 1. विद्यापीठ, महाविदयालयातील प्राध्यापक यांचे करिता रिमोट सेन्सिंग व जीआयएस विषयांवर प्रशिक्षण देणे.
 2. विद्यापीठ, शैक्षणिक कर्मचारी प्रशिक्षण विद्यालय आणि इतर संस्था मध्ये तंत्रज्ञान प्रसारणासाठी व्याखान देणे.
 3. शैक्षणिक संस्थामधील प्राध्यापक वर्गाच्या एमआरसॅकला भेटी आयोजित करणे.

विद्यार्थी

 1. महाविद्यालयीन तसेच अभियांत्रिकी विद्यार्थी वर्गासाठी “तंत्रज्ञान प्रसाराकरिता” प्रशिक्षण आयोजित करणे.
 2. सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली उपयोजना बाबत प्रात्यक्षिक देण्यासाठी आणि सोफ्टवेअर विकसित करण्याच्या संधी देण्यासाठी विद्यार्थीच्या भेटी आयोजित करणे. प्रत्येक महिनाचा शेवटचा कामकाजी दिवस हा या कार्याकरिता राखून ठेवला आहे. तरी आपला अर्ज  info@mrsac.maharashtra.gov.in ह्या इमेल वर पाठवावा.
 3. MCA, B Tech (Computer Science/IT), MSc/ MS (Geoinformatics) विद्यार्थ्यांना ६ महिन्यासाठी त्यांचे शैक्षणिक गरजे नुसार प्रकल्प/ सोफ्टवेअर विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देणे.
 4. विविध विषयातील M Tech विद्यार्थ्यांना १० महिने ते १२ महिन्यापर्यंत त्यांचे शैक्षणिक गरजे नुसार प्रकल्प/ सोफ्टवेअर विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देणे.

गरजेनुसार प्रशिक्षण

 1. पाणलोट प्रकल्प रिपोर्ट तयार करण्यासाठी प्रशिक्षण देणे.
 2. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना, एमआरसॅक तर्फे पुरविण्यात आलेल्या मानचित्राचा त्यांचे कार्यात उपयोग करण्याबाबत प्रशिक्षण देणे.